मुंबई: नालासोपारा पश्चिमेकडील निले-मोरेगावजवळील आनंद व्ह्यू या इमारतीतील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटीतील सेप्टिक टँक साफ करण्यासाठी खाली उतरले होते. त्याचदरम्यान विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सुनील चवरिया, बिका बुबक आणि प्रदीप सरवटे यांचा हा दुर्घटनेत मृत्यू झाला असून, या तिघांचे मृतदेह सेप्टिक टँकमधून बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस जखमी झाले असून, ते मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.