नवापूर। शहरातील बसस्थानक मार्गावरील नाल्यातील दुर्गधीने शहरवासी हैराण झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासुन नाले सफाईच झालेले नसल्याने त्याचा परिणाम आज शहरवासीयांना अंत्यत दुर्गधी वासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रोज येथुन जाणारा नागरीक तोडांला रुमाल लावुन जात असतो. शहरातील हा मुख्य मार्ग असुन शहरातील प्रत्येक नागरीकाला या नाल्यावरुनच रोज ये जा करावे लागते. गेल्या काही महिन्यांपासुन या नाल्यातुन खुपच घाण वास येत असुन या नाल्याजवळुन जातांना प्रत्येकाला दुर्गधीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे स्वच्छता अभियान शासन राबवत असतांना नगरपालिकेचा नाले सफाई दुर्लक्षामुळे दुर्गंधी फैलाव अभियान सुरु असल्याचे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. या नाल्याचा पुढे बसस्थानक,शाळा,काँलेजस,बाजार पेठ,अन्य शासकीय कार्यालये आहेत. महापुरुषांचा पुतळा जवळच आहे. या परिसरातून अधिकारी व पदाधिकारी फिरायला जातात.
नाल्यांमध्ये अतिक्रमणाचे जाळे
पावसाळ्यापुर्वी नगर पालिकेने नाले सफाई करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने नाले परिसरात दुर्गधी पसरली असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तसेच नाल्यात संरक्षण भिंत नगर पालिकेने बांधली मात्र तेथील रेती कपची व इतर मटेरियल तेथुन उचलले नाही. नाल्यात का़ही भागात अतिक्रमण होत आहे. यामुळे पुढचा काळात सर्वच नाले अतिक्रमणाचा जाळ्यात येऊन नाल्याचे अस्तित्वच संपणार आहे. शहरातील नाले घाण व दुर्गधी त असुन या भागातील रहिवांशीचे आरोग्य सलाईनवर आहे. या भागातील लोकांनी सांगितले की नाले सफाई सफाई ही नाले अस्तित्वात आल्या पासुन झालेलीच नाही अशी तक्रार केली आहे. आम्ही नाले सफाईची मागणी दरवर्षी करतो मात्र ती केली जात नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यापासुन नाल्यातुन खुपच दुर्गधी येत असुन ती असह्य झाली आहे. याकडे नगर पालिकेने लक्ष देऊन उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.