धुळे। तालुक्यातील माहीर फाट्याजवळ मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात पूल वाहून गेल्याने सुरत-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अवजड वाहने वगळता छोटी वाहने नेर-म्हसदी मार्गे वळवण्यात आली आहे.दरम्यान, बुधवारी सायंकाळी याच महामार्गावर दोन ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने एक दिवस वाहतूक ठप्प झाली होती. नाल्याच्या पुराच्या पाण्यात रस्ता वाहून जाण्याच्या सलग दोन दिवशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये महामार्ग चौपदरी करणाचे काम करणार्या जीएचव्ही कंपनीच्या कामाविषयी संताप व्यक्त होत आहे.
चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने
चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने चालत असून वाहनधारकाना मोठी कसरत करवी लागत आहे . त्यातच पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक ठिकाणी रोडवर पडलेल्या खड्यामध्ये पाणी भरून जाते त्यामुळे वाहनधारक,जीवाची कसरत करून वाहने चालवीत आहेत