जळगाव : रामानंद नगर परिसरातील विवेकानंद नगरातील सर्वे नं. 149/165+क मधील प्लॉट क्रमांक 14 या घराच्या स्वयंपाक घरात नाल्याचे सांडपाणी व श्वापदे शिरत आहेत. सांडपाणी व श्वासपादांमुळे प्लॉट नं. 14 मधील रहिवाशी संगिता रामकृष्ण पाचपांडे यांचे त्यांच्या कुटूबियांचे जीवन धोक्यात आलेले आहे. शहराच्या नियोजन आराखड्यानुसार मंजूर आराखड्यानुसार वाहत असलेला नाला संगिता पाचपांडे यांच्या खाजगी मालमत्ते मधून वळविण्यात आले असून हा नाला यासंदर्भात त्यांनी 6 एप्रिल 2015 लोकशाही दिनी तक्रार केली होती. याबाबत त्यांनी तात्कालीन महसूल मंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, मनपाआयुक्त, नगररचना सहाय्यक संचालक, मनपा लोकशाही दिन येथे वारंवार तक्रार करूनही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
नागरिकांच्या वारंवार मागणीस प्रतिसाद नाही
संगिता पाचपांडे यांच्या प्लॉटमधून नाला वळविण्यात आल्याने त्यांच्या स्वयंपाक घरातील किचन ओटा शनिवार 31 डिसेंबर 2016 साली नाल्याच्या पाण्यामुळे खाली धसला यात त्यांच्या किचनमध्ये खड्डा पडला आहे. या खड्ड्यांतून स्वयंपाक घरात नाल्याचे पाणी व साप येत आहेत. या श्वापदांमुळे संगिता पाचपांडे व त्यांच्या कुटूंबियांचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच 6 एप्रिल 2015 साली परिसरातील नागरिकांनी हा नाला हटविण्याची मागणी लोकशाही दिनी केली होती. त्यांच्या मागणीला मनपाकडून सकारत्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यानुसार नगररचना विभागाने नाल्याचा वहिवाट बदलविण्यात आल्याचे मान्य करून सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभाग यांच्या मदतीने नवीन रित्या शक्य होईल असा अभिप्राय 30 एप्रिल 2015 रोजी दिला होता. मात्र, अद्याप नाल्याचा वहिवाट बदलिवण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.