नावलौकीक हवा असेल तर ध्येय उच्च ठेवा

0

चोपडा। न्यूगंडाची भावना बाळगू नका, जीवनात यशस्वी होवून नावलौकीक मिळवायचा असेल तर ध्येय उच्च ठेवा, ते गाठण्यासाठी वेळचे व अभ्यासाचे अचूक नियोजन करा, असा सल्ला येथील डॉ.प्रेमचंद महाजन यांनी विद्यार्थींना दिला. स्वामी विवेकानंद युवा फाउंडेशन व शीतल अ‍ॅकॅडमीतर्फे रविवारी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. नगरपालिका नाटयगृहात हा कार्यक्राम पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

मान्यवरांनी दिले विद्यार्थ्यांना यशस्वितेचे धडे
केवळ गुण मिळवणे म्हणजे यश नव्हे, प्रतिकुल परिस्थितीचा बाऊ करू नका, मनातील न्यूनगंडाची भावना दूर करून मोठे स्वप्न पहा, स्वप्न साकारण्यासाठी जिद्द, चिकाटीने परिश्रम घ्या, असा सल्ला ही त्यांनी दिला. गेल्या अनेक वर्षीपासून लोकसभागातून फाऊंडेशन नेहमी सेवाभावी प्रामाणिकपणे काम करत असते. कार्यक्रमांना शहरातून भरपूर प्रतिसाद मिळत असतो. फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी, पदाधिकारी सदस्य व शितल अ‍ॅकडमीचे विजय पाटील, गौरव महाले, संजय बारी यांनी आयोजन केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रास्ताविक संजय बारी यांनी तर सूत्रसंचलन राधेशाम पाटील यांनी केले.

17गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून सत्कार
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, डॉ.प्रेमचंद महाजन, पंकज समुहाचे संचालक पंकज बोरोले, कैलास बोरसे, शुभम सैंदाणे (फैजपूर) , सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी, दिलीप पाटील (यावल), एन.डी.पाटील, शशिकांत महाजन (धरणगाव), शुभम पाटील (अडावद), लक्ष्मण पाटील (चुंचाळे यांची उपस्थिती होती.