नाशिक : हल्ली महिलांना बदनाम करण्यात नाशिककर अधिक पुढे असल्याचे दिसते. कारण सध्या नाशकात सायबर क्राईम पोलिस ठाण्याचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटले असून दोन महिन्यात सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी करण्याचे प्रकार समोर आले आहेत.
विसेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. मुलांच्या अशा विकृत कृतींमुळे अनेक मुलींना जगणेही असह्य झाले आहे. त्यामुळे पालकांनो सावधान, आपली मुले सोशल मीडियाच्या जाळ्यात अशाप्रकारे ओढले तर जात नाही ना याची काळजी घेण्याची आता प्रत्येकावर वेळ आली आहे. नाशिकमध्ये सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटले असून, सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामीचे प्रकार, दोन महिन्यात सहा गुन्हे या कालावधीत सायबर फसवणुकीसंदर्भात 12 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सहा गुन्हे हे लैंगिक अपराधांसंदर्भातील आहेत. या सहाही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर जेव्हा बदनामीकारक मजकूर वा छायाचित्र व्हायरल होतात त्यानंतर संबंधितांना काय सहन करावे लागले असेल याची कल्पनाही केलेली बरी.
सामाजिक शांततेला धोका
सामाजिक घडमोडींसह खासगी आयुष्यातील बर्या वाईट अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी सोशल मीडियाचा जन्म झाला खरा; मात्र या माध्यमाचा वापर करून अनेक अपप्रकार सुरू झाल्याने सामाजिक शांततेलाच धोका निर्माण झाला आहे. विशेषत: किशोर आणि तरुणवयीन मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे छायाचित्र व्हायरल करणारे आणि केवळ दुसर्याची बदनामी करायची म्हणून त्यांच्या नावाचे बनावट अकाउंट करणार्या ङ्गमहाभागांचाफ वावर आता या सामाजिक माध्यमांवर वाढला आहे. त्यात अनेक मुलींना मोठाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता या प्रकारांमुळे निर्माण झाली आहे.
तक्रारींसाठी करा संपर्क
सायबर क्राइमशी संबंधित कोणाच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी 9762100100 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गोपनीय ठेवले जाते.