नाशकात स्टेट बँकेचे एटीएम फोडले; ३१ लाखांची रोकड लंपास !

0

नाशिक: नाशिकच्या मखमलाबाद चौकात स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे. त्यातून तब्बल ३१ लाखांची रोकड लंपास करण्यात आले आहे. आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे. काल म्हणजेच बुधवारीही चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले होते. आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे.

आज पहाटेच्या सुमारास मखमलाबाद या ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडले. हे एटीएम फोडून चोरट्यांनी ३१ लाखांची रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी ही घटना समजताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. दोन दिवसात दोनवेळा एसबीआयचे एटीएम फोडून पैसे लंपास केल्याने या एटीएम फोडणाऱ्या टोळीला शोधण्याचे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे.