नाशिक । महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत आहे.या रणधुमाळीत नाशिककरांसाठी अनेक पक्षांनी वचनाच्या खिरापती वाटप करित आहे. त्यातच शिवसेनेने आपला वचननामा प्रसिध्द केला आहे.त्यांत सुरक्षित नाशिकसह पुररेषेचा पुनर्विचार, आरोग्यसेवा, स्वच्छपाणी पुरवठा अशा पायाभूत सुविधांसह ई स्वच्छतागृह, वायफाय सीटी, पर्यटन विकास अशा अधुनिक घटकांचा सामावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नाही फक्त अश्वासन, पूर्ण केले आम्ही वचन ब्रीद घेत विकासनामा प्रसिध्द केला आहे.त्यात नाशिक शहरालगतच्या देवळाली, भगूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आदी छोटया शहरांना जोडण्यासाठी मेट्रो ट्रेन, गोदावरीचे नैसर्गिक स्त्रोत खुले करणार, हक्काचे किकवी धरण देणार, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर या व अशा विविध विकासकामांचा समावेश करण्यात आला.राष्ट्रवादी,भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात मेट्रो हे दिवसा ढवळ्या स्वप्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या वचननामा,विकासनामा यातून मतदार किती प्रमाणात कोणाच्या बाजूने कौल देतात हे तर मतदानाच्या दिवशी ठरणार आहे.
शिवसेनेचा वचननामा : शिवसेनेने नाशिक मनपा काबीज करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. शिवसेनेच्या वचननामा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे याच्या हस्ते प्रसिध्द करण्यात आला. या वचननाम्यात सर्वात अधिक प्राधान्य सुरक्षित नाशिकला देण्यात आले आहे.सर्वदूर सीसीटिव्हीचे नेटवर्क उभारून थेट स्थानिक पोलिस ठाणे व आयुक्तालयाशी जोडलेले असेल त्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल रूम तयार करण्यात येण्याचे वचन दिले. लादलेल्या पुररेषेमुळे लाखो घरे बेकायदेशीर ठरवली गेली आहेत. गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करून या माध्यमातून पुररेषेच्या मर्यादा कमी करून गंगापूररोड, समांतर रोड, जुने नाशिक, पंचवटी तसेच शहरातील नदी किनारील बांधकामास चालना देणार हा नाशिककरांचा जिव्हांळ्याचा प्रश्नाला हात घातला आहे. यासह युवकांना रोजगारासाठी इंडस्ट्रीअल, एज्युकेशनल, फायनान्शियल आणि सायन्स रिसर्च क्लस्टरची निर्मिती करून प्रोत्सहान देणे, उद्योजकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.स्थानिक उत्पादनाला बाजार पेठ मिळावी.पर्यटनाचा नवा विचार यामध्ये मांडण्यात आला आहे. शहर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांच्या पंकतीत बसविण्यासाठी सर्व पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक स्थळांच्या जिर्णोद्धारासह सौंदर्यीकरण करणार तसेच नाशिकची द्राक्षे, वाईन, चिवडा, तांदूळ, मिसळ यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन देण्यातआले आहे. ‘सुंदर नाशिक आपले नाशिक’, गार्डन्सची निर्मिती, सुसज्ज पार्किंग, पिण्याचे स्वच्छ पाणी, संपुर्ण शहर सोलर सीटी करण्यास प्राधान्य देत प्रोत्सहान देण्यासाठी योजना याद्वारे अपांरपारिक उर्जेचा पुरोगामी विचार अशी थोड्याशा इच्छाशक्तीने सहज प्रत्यक्षात उतरणारी अश्वासने वचन नाम्यात दिली आहेत. मात्र वचननाम्याद्वारे दिलेली अश्वासने किती नाशिककरांचे मने शिवसेनेच्या मतदानात रूपांतर करतात यावरच खरे भवित्यव्य ठरणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासनामा : भविष्याचा विचार करून नाशिक शहरालगतच्या देवळाली, भगूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आदी छोटया शहरांना जोडण्यासाठी मेट्रो ट्रेन, गोदावरीचे नैसर्गिक स्त्रोत खुले करणार, हक्काचे किकवी धरण देणार, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर या व अशा विविध विकासकामांचा समावेश असलेला विकासनामा नामा पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. भगिरथ शिंदे, नाना महाले, आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जयंत टिळे,अंबादास खैरे, निवृत्ती आरंगिळे, अफतार शेख, महेश भामरे, मनोहर कोरडे,भरत जाधव, संजय खैरनार यांच्या उपस्थितीत झाला. या विकासनाम्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कालावधीत पूर्ण झालेली बोट क्लब, नाशिक कलाग्राम, ग्रीन जीम, पासपोर्ट कार्यालय, विमानतळ या कामांचा उल्लेख केलेला आहे. याशिवाय चांगले फुटपाथ , अपघातप्रवण स्थळी पादचारी पुलांची निर्मिती करत नागरिकांना सुरक्षा देणार, दर्जेदार व गुणवत्तेची हमी देणारे रस्ते देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.सांडपाणी व्यवस्थेबाबत मलनिस्सारण यंत्रणेचे नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार योजना, सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन तसेच शहरातील जुन्या गावठाणच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, शहर विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक अटी रदद करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे. किकवी धरण उभारणार, शुध्द पाणी, महिलांसाठी मोबाईल टॉयलेट, पदपथांवर स्टीलच्या कचराकुंडया, याचबरोबर घनकरचरा व्यवस्थापन, कचरयाचे वर्गीकरण करून शहर स्वच्छता करण्याचा संकल्प यात मांडण्यात आला आहे.सिंहस्थाच्या निमित्ताने निर्माणझालेल्या गोदावरी घाट विकास, ग्रेटर नाशिक मेट्रो टेन हा प्रकल्प हाती घेणार, त्याव्दारे छोटी गावे जोडून शहरवासियांचा प्रवास सुखकर करण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.