नाशिकच्या प्रसिद्ध शायरा रइसा खुमार आरजू यांचा पुण्यात गौरव

0

पुणे । नाशिक येथील प्रसिद्ध शायरा रइसा खुमार आरजू यांना नुकताच पुणे येथे साइंदर प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. रईसा खुमार यांचे माहेर जळगाव असून उर्दू काव्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. त्या हिंदीत उत्कृष्ट गजल, कथा, लतिल लेखन, संशोधनपर लेख लिहितात. सोनइन्दर प्रतिष्ठान तर्फे 5 मे रोजी पुण्यात अध्यक्ष डॉ. दामोदर खडसे व प्रमुख अतिथी उल्हास पवार यांच्या उपस्थितीत 2018 पुरस्कार प्रदान समारंभ झाला.

अनुवाद समिक्षा साहित्याचे महत्त्वाचे अंग !
इंदोर येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुर्यकांत नागर यांना प्रतिष्ठानच्या साहित्य महासागर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुण्यातील साहित्यदीप प्रतिष्ठान ला ’साहित्य सेवा’ पुरस्कार देण्यात आला. मराठी काव्यासाठी संगीता जोशी, हिंदी काव्यासाठी नीलम सक्सेना चंद्रा अनुवादासाठी चंद्रकांत भोंजाळ, तर उर्दू काव्यासाठी रईसा खुमार यांना यावेळी साहित्यिक कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले. अनुवाद, समीक्षा यांना दुय्यम दर्जा देऊ नये; हे साहित्याचे महत्वाचे अंग असल्याचे मत सुर्यकांत नागर यांनी यावेळी व्यक्त केले. संगीता जोशी, नीलम सक्सेना व रइसा खुमार यांनी आपल्या रचना सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काव्यसंध्या हे तीन भाषांचे कविसंमेलन कोचीन येथील हिंदी कवी संतोष एलेक्स यांच्या अध्यक्षतेखाली झाले.