Cheating an adult of Amalner of three lakhs : Crime against one अमळनेर : नाशिक शहरातील एकाने अमळनेर शहरातील 46 वर्षीय प्रौढ इसमाची तीन लाख रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यवहाराची पूर्तता न करता रक्कमही लाटली
शहरातील शिव प्लाझा भागातील रहिवासी सुनील रघुनाथ चव्हाण (46) यांनी संशयीत आरोपी समीर सर्जेराव पाटील (रा.सनफलावर सुयोजित गार्डन सहदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना तीन लाख रुपये दिले होते मात्र 6 नोव्हेंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत व्यवहाराची पूर्तता न करता समीर पाटील यांनी रक्कमही परत न करता फसवणूक केल्याने या प्रकरणी अमळनेर पोलिसात चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुनील हटकर करीत आहेत.