नाशिक : डाऊन जयनगर पवन एक्स्प्रेसचे 11 डबे लहावीट-देवळाली दरम्यान रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घसरल्यानंतर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाने या अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द केल्याची प्राथमिक माहिती आहे. 12109 सीएसएमटी-मनमाड पंचवटी, 12110 मनमाड-मुंबई पंचवटी व 11401 मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस तातडीने रद्द केली आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
22221 राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरांतो हा छत्रपती शिवाजी टर्मिनल-वसई रोड-जळगावमार्गे तर 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस व्हाया एलटीटी-पुणे-मनमाड मार्गे चालवण्यात येणार आहे.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
12109 डाऊन मुंबई-मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस 3 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे तर 12110 अप मनमाड-मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस सोमवार, 4 एप्रिल रोजी तर 11401 डाऊन मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस रविवार, 3 मार्च रोजी रद्द करण्यात आली.
या गाड्यांचे बदलले मार्ग
22221 डाऊन मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेस व 12261 डाऊन मुंबई-हावडा दुरांतो सुपरफास्ट एक्सप्रेस रविवारी रविवारी वसई रोड-नंदुरबार-जळगावमार्गे वळविण्यात आली आहे तसेच 12173 डाऊन एलटीटी-प्रतापगढ उद्योगनगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस रविवारी लोणावळा-पुणे-दौंड-मनमाड* मार्गे वळविण्यात आली आहे.