चाळीसगाव। नाशिक येथील राहणार 35 वर्षीय आरोपीने नाशिकमधून मोटार सायकल चोरून चाळीसगाव येथे विक्री केल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वाहनांसह आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक जगन्नाथ महाजन (वय 35, रा. 10 विनोद अपार्टमेंट, एनडी पटेल रोड, त्र्यंबक नाका नाशिक) हा वाहन चोरी करुन सदरची वाहने चाळीसगाव शहरात विक्री केली असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीतास अप्पर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी अरविंद पाटील व पोनि सुनिल गायकवाड, सपोनि आर.बी.रसेडे यांचे मार्गदर्शनारखाली पोहेकॉ शशिकांत पाटील, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ बापू पाटील, पोकॉ गोवर्धन बोरसे, पोना अरूण पाटील, पोकॉ अरुण पाटील, पोकॉ गोपाल बेलदार, पोकॉ गोपाल भोई, संदीप जगताप आदी पोलिलस पथकाने सापळा रचून नाशिक येथून अटक केलेली आहे.
सर्व वाहने नाशिकची; सर्व वाहने केली जप्त
त्यानंतर साक्षीदार नामे सागर अनिल देशमुख (रा.चाळीसगाव व संभाजी बाबुराव देशमुख रा. नागदरोड) यांना आरोपी दिपक महाजन याने विक्री केलेल्या हिरो होंडा सी.डी. डिलक्स काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक एम एच 15 सी क्यु 4668 व एक हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल, काळ्या रंगाची तिचा क्र.(एमएच 15 इबी 9787) व एक पांढरे रंगाची अॅक्टीवा अशी वाहने ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. आरोपीने सर्व वाहने नाशिक परिसरातून चोरी केल्याचे सांगितले आहे. त्यास संशयावरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून याशिवाय इतर देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोहेकॉ. शशिकांत पाटील हे करीत आहेत.