नाशिक – मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवणार्या नाशकातील ङ्गएक्झॉटिक स्पाफवर पोलिसांनी बुधवारी छापा टाकत आठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला होता. त्यामुळे संशयित स्पा चालकाला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील कॉलेज रोडवरील महात्मानगर, तसेच गंगापूररोड यासारख्या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्या रहिवासी भागातच स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास कुंटणखाना चालवला जात असल्याचे पोलिसांच्याच कारवाईतून वारंवार उघडकीस येत आहे. तरीही संबंधित व्यावसायिक महिना-दोन महिने व्यवसाय बंद करून पुन्हा हा उद्योग सुरू करत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील हॉलमार्क चौकातील मॉलला लागून असलेल्या इमारतीत ङ्गएक्झॉटिक स्पाफ येथे अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती.
त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत सूचना दिली. त्यानुसार बनावट ग्राहक म्हणून पोलिस कर्मचार्यालाच ङ्गस्पाफमध्ये पाठवले असता मिळालेली माहिती खरी ठरली. दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने तेथे छापा टाकला. या ठिकाणी काउंटरवर अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला पोलिसांसह कर्मचार्यांनी स्पा सेंटरमध्येच धाव घेतल्यानंतर वेगवेगळ्या ङ्गकंपार्टमेंटफमध्ये आठ तरुणी पाच युवक ग्राहक आढळले. पोलिसांनी या तरुणींसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.