नाशिकरोड रुंदीकरणाचे लांडगेंचे गडकरींना साकडे

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गाच्या 90 मीटर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्याची मागणी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली, याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी गडकरी यांना निवेदन दिले आहे. नाशिक रोडच्या 90 मीटर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास नागरिकांना कमी वेळेत नाशिकला जाता येणार आहे. भेटीवेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम मंचरपर्यंत पुर्ण झाले आहे. त्याच्या पुढे काम रखडले आहे. आळा फाटा ते नाशिक रोड 90 मीटर रस्त्याचे रुंदीकरण आहे. हा रस्ता पुर्ण झाल्यास दोन तासात नाशिकला जाणे शक्य होईल. नागरिकांचा वेळ वाचेल. आता चार ते पाच तास लागतात, असेही महेश लांडगे म्हणाले.पवना धरणातून जलवाहतूक सुरु करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिका-यांनी केली. मुंबईत नऊ डिसेंबर रोजी पाण्यावर विमान उतरविण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. ते प्रात्यक्षिक पाहण्याचे निमंत्रण गडकरी यांनी दिले आहे. त्यानंतर पवना धरणातून जलवाहतूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.