नंदुरबार। नाशिकहुन आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील लोकांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार स्वयंसेवी संस्थांच्या वतीने जेवण देण्यात आले. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 90 लोक नवापूर चौफुली येथे नाशिकहुन पायी किंवा खाजगी टेम्पोमध्ये आल्याचे आज आढळून आले.
त्यातील बरेचसे उपाशी असल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत करण्यात आली, त्यानंतर वैद्यकीय तपासणीअंती त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तसेच पोलीस निरीक्षक सुनील नांदवळकर आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत लॉक डाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लोक बाहेर गावी अडकून पडले आहेत, काही लोक पायी किंवा मिळेल त्या वाहनाने कसे बसे आपले गाव गाठत आहेत,