नाशिक आयजींच्या पथकाची कारवाई : गावठी कट्ट्यासह मुंबईतील तरुण जाळ्यात

चोपडा : नाशिक आयजींच्या विशेष पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्ट्याची खरेदी करणार्‍या मुंबईतील तरुणाच्या गावठी कट्ट्यासह मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईने अवैध गावठी शस्त्र विक्री पुन्हा ऐरणीवर आली आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. मो.वसीम सुलतान शेख (22, रा.साईबाबा मंदिराजवळ, जिजामाता नगर, भोसले मार्ग, अहिल्याबाई चाळ, अण्णा भाऊ साठे नगर, रूम नं.1277 मानखुर्द, शिवाजी नगर, मुंबई) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे तर गावठी कट्टा पुरवठादार गुरूदेवसिंग उर्फ खटका लिवरसिंग बडोल (रा.पार उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) हा पसार झाला असून दोघांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, हवालदार सचिन धारणकर, नाईक मनोज दुसाणे, नाईक कुणाल मराठे, नाईक प्रमोद मंडलिक, चोपडा ग्रामीणचे हवालदार राकेश पाटील, नाईक रीतेश चौधरी व किरण पाटील आदींच्या पथकाने केली.