नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
कामावरून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचार्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी चुंभळे यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. पंरतु तीन लाख देण्याचे निश्चित करण्यात आले होते.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार एसीबीचे अधीक्षक सुनील कडासने यांनी स्वत: चुंभळे यांच्यावरील कारवाईसाठी सापळा रचला होता.दरम्यान, तीन लाखांची रक्कम घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.शिवाजी चुंभळे हे सध्या शिवसेनेत असून नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते.