नाशिक नियोजन उपायुक्तांची चाळीसगाव पं.स.ला भेट

0

चाळीसगाव – दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामांची पाहणी नाशिक नियोजन उपायुक्त यांनी आज 28 रोजी तालुक्यातील मेहुणबारे व सेवानगर गावांची पाहणी करुन चाळीसगाव पंचायत समितीला भेट दिली. दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत कामांबाबत मुल्यमापन पाहणी करीता नाशिक नियोजन उपायुक्त प्रदीप पोद्दार व जळगाव जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री पाटील यांनी आज दिनांक 28 रोजी तालुक्यातील मेहुणबारे व सेवानगर गावांना भेटी देवुन दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली व दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंचायत समिती येथे येवुन स्थानिक पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवरकामासंबंधात काही अडचणी येतात का याबाबत चर्चा करुन संबंधित योजना कशी राबवली जाते किंवा कशी राबवावी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्तार अधिकारी बी.एस.बागुल व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.