जळगाव : नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2018-19 नुकत्याच धुळे येथे पार पडल्या. स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस संघाने व्हॉलीबॉलमध्ये सुवर्ण, हॉकीमध्ये रजत तर कबड्डीमध्ये कांस्य पदक पटकावले. तिन्ही संघ विजयी होवून जिल्ह्यात परतले आहेत. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा क्रीडा संघ सहभागी झाला होता. क्रीडा प्रमुख सम्राट वाघ यांच्या सूचनेनुसार हॉकी, कब्बडी, व्हॉलीबॉल संघाने उत्तम प्रदर्शन दाखविले. पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा व्हॉलीबॉल संघाने स्पर्धेत सुवर्ण पदक, हॉकी संघाने रजत पदक तर कबड्डी संघाने कांस्य पदक पटकावले.
हॉकी संघाचे प्रशिक्षक रवी नरवाडे, कर्णधार अक्रम शेख, शिवाजी धुमाळ, सलीम तडवी, इम्रान सैय्यद, शाहदाब सैय्यद, किशोर महाजन, मुकेश तडवी, मोहसीन खान, मनोज सुरवाडे, तौसिफ शेख, इस्तीहात सैय्यद, सुकेश तडवी, शरीफ तडवी, जावेद तडवी, सुनील सैंदाणे यांचा संघात समावेश होता. कब्बडी संघात कर्णधार सुधीर सावळे, असीम तडवी, राहुल चौधरी, उज्ज्वल जाधव, विशाल पवार, संकेत झांबरे, योगेश सावळे, गोरख चकोर यांचा समावेश होता.