नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु!

0

वेळापत्रक जाहीर, आजपासून नियमित सेवा सुरु होणार

पुणे : नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरु होणार आहे. नाशिककरांच्या मागणीनुसार ओझरहून सकाळी 6 वाजता विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. हे विमान 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. तर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणेसहाला नाशिकमध्ये पोहोचणार आहे. नंतर नाशिकहून पुण्याला 6 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण घेईल, तर पुण्याहून नाशिकच्या दिशेने 7 वाजून 5 मिनिटाने विमानाचे उड्डाण होणार आहे. रात्री पावणेआठला ते ओझर विमानतळावर उतरेल.

वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बूकिंग
तांत्रिक अडचण, पायलटची कमतरता, स्लॉटची मर्यादा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काही दिवसांपासून नाशिक- मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा रखडली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु होत आहे. एअर डेक्कनने वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बूकिंग सुरु ठेवले आहे. मात्र, बूकिंगसाठी प्रवाशांनी एअर डेक्कनच्या वेबसाइटवर शोध घेतला असता, पुढील सर्व तिकीटे विकली गेल्याचे दर्शविले जात आहे. नवीन वेळापत्रकानुसार उद्यापासून सेवा सुरळीत सुरु होणार आहे. लोकांचा ओघ वाढावा यासाठी सवलतीच्या दरात काही तिकीटं ठेवले आहेत. निवडक प्रवाशांना अवघ्या 573 रुपयात मुंबई गाठता येणार आहे.

वेळापत्रक
– ओझर-पुणे : 6.5 मिनिटांनी उड्डाण, 7.05 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार
– पुणे-ओझर : 7.5 मिनिटानी उड्डाण, 7.45 ला ओझरला पोहचणार