नाशिक-पुणे 3 तासात!

0

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा 137 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक-पुणे रस्तेप्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. हा नवा मार्ग खुला झाल्याने प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. पूर्वी जिथे सहा तासांचा वेळ लागत होता, तिथे आता केवळ तीन तासातच नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे. उशिरा का होईना अखेर दोन्ही शहरांमधील प्रवाशांची इच्छा पूर्ण झाली आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर भाग असलेल्या या रस्त्याचे काम आयएल अँड एफएस कंपनीने केले आहे. 137 पैकी 104 किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून 76 टक्के काम पूर्ण झाल्याने रस्ता आणि पथकर वसुली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामात 67 किमी नवीन रस्ता, 8 बाह्य वळण रस्ते, 5 घाट दुरुस्ती, 9 मोठे आणि 23 लहान पूल बांधले आहेत. 8 ग्रेड सेपेरेटर, 32 ठिकाणी अंडरपास, ट्रक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.