नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक सुरू

0

नाशिक । सव्वा दोन तासांच्या खोळंब्यानंतर नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक अखेर सुरू झाली आहे. या मार्गावर खोळंबलेल्या सर्व रेल्वेच्या गाड्या मार्गस्थ झाल्या आहेत. ओढा-नाशिक स्टेशनदरम्यान वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या खोळंब्याचा मोठा
परिणाम नाशिक-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही झाला होता.

एक्स्प्रेस खोळंबल्या
दोन तासांपासून नाशिक-मुंबई मार्गावरील मंगला एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, पटना एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या खोळंबल्या आहेत. अखेर बिघाड दुरुस्त झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.