चाळीसगाव। शहरातील मालेगावरोड वरील शीतल मोटर्सच्या शेजारून 14 ते 15 मार्च 2017 रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याांनी बजाज पल्सर मोटारसायकल लांबविली होती. त्याचा शोध चाळीसगाव शहर पोलिसांनी घेतला असून त्या दोघा मोटारसायकल चोरांना 3 एप्रिल रोजी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना 4 एप्रिल रोजी चाळीसगाव न्यायालयात उभे केले असता दोघा आरोपींना 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड वरील शीतल मोटर्स जवळ असलेल्या अरुण काशिनाथ पाटील (58) यांच्या मालकीची बजाज पल्सर एम एच 19 सी सी 3877 हि 30 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरटयांनी 14 मार्च 2017 रोजी रात्री 9 ते 15 मार्च 2017 सकाळी 6:30 वाजेदरम्यान त्यांचे दारातून अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास पोलीस नाईक योगेश मांडले करीत होते. नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन ला मोटारसायकलसह 2 आरोपी अटक असल्याची माहिती पोलीस नाईक योगेश मांडले यांना मिळाली होती. यानुसार मांडले यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला संशयीत महेश बळीराम शिरसाठ (23) रा गोवर्धन गाव डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्याजवळ गंगापूर नाशिक व अक्षय प्रदीप कुरकुरे (19) जय जगदंबे रेसिडेन्सी रूम न 3 शिवाजी नगर सातपूर नाशिक या दोघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली होती. गंगापूर पोलीसांनी त्यांच्याकडून चाळीसगाव येथून चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत केली होती.
या प्रकरणी महेश बळीराम शिरसाठ हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता. तर अक्षय प्रदीप कुरकुरे याची जामिनावर मुक्तता झाली होती. चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने न्यायालयाची परवानगी व इतर सोपस्कार पूर्ण करून वरील दोघं आरोपीना 3 एप्रिल रोजी पोलीस नाईक योगेश मांडले अरुण पाटील व संभाजी पाटील यांनी नाशिक येथून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. मंगळवार 4 एप्रिल रोजी त्यांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता दोघांना 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश मांडोळे अरुण पाटील संभाजी पाटील करीत आहे.