नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशी अधिकार्‍यासह खाजगी पंटर जाळ्यात

0

धुळे एसीबीची धडक कारवाई ; चौकशी अंतिम अहवालासाठी स्वीकारली 25 हजारांची लाच

धुळे : विभागीय चौकशीचा अंतिम अहवाल शासनास पाठवण्याचे काम केल्याने त्यापोटी 25 हजारांची लाच स्वीकारणार्‍या नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार (48) यांच्यासह खाजगी पंटर प्रशांत सुभाष गवळी (27, धुळे) यांना धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केली. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे प्रभाकर पवार हे वर्ग एकचे अधिकारी असून त्यांची मंत्रालय महसूल विभागात सहसचिव पदावर नियुक्ती असून तूर्त त्यांची नाशिकला प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. रात्री उशिरा आरोपीच्या नंदुरबारातून मुसक्या आवळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे एसीबीची धडाकेबाज कारवाई
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, निरीक्षक महेश भोरटेकर, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, सुधीर सोनवणे, शरद काटके, सतीश जावरे, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, भूषण खलाणेकर, संदीप कदम आदींच्या पथकाने केली.