नाशिक विभागीय प्रोटॉन सहविचार सभा संपन्न

0

भुसावळ। राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संलग्न प्रोटॉन सहविचार सभा 3 रोजी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य प्रभारी प्रा. रमेश मकासरे होते. यावेळी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रा. मकासरे यांनी उपस्थित कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येवून संघटना बळकट करण्याची आवश्यकता आहे तसेच संघटनेचा देशभर विस्तार करुन शिक्षकांना न्याय देण्याचे कार्य केले जाईल. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, आर.पी. तायडे, एस.एस. जंगले, उल्हास पाटील, प्रशांत पाटील, अर्जुन कोळी, दिलीप मेढे उपस्थित होते.