नाशिक शहरात केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे लवकरच सुरू होणार कार्यालय

नाशिक : नाशिक शहरात लवकरच केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे कार्यालय सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने कार्यरत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि सीबीआयचे अधिकारी यांनी संयुक्त पत्रकार परीषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

रणजीतकुमार पांडे नाशिक सीबीआयचे नूतन निरीक्षक
लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून या संदर्भात काही तक्रार असल्यास संपर्क साधाा, असे आवाहन करण्यात आले असून त्याची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सीबीआयचे पोलिस निरीक्षक रणजित कुमार पांडे हे नाशिकचे कामकाज पाहतील. सद्यस्थितीत सीबीआयचे कार्यालय मुंबई येथे आहे. तेथूनच कामकाज सुरू आहे मात्र लवकरच नाशिकमध्येही सीबीआयचे कार्यालय सुरू होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.

सीबीआयकडे तक्रारीसाठी येथे साधा संपर्क
सीबीआयकडे तक्रार करण्यासाठी 022-26543700, 8433700000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.