नासाचा अहवाल व भयावह वास्तव

0

अमेरिकेच्या नासा या वैज्ञानिक संस्थेच्या एका शाखेने महासागराची पाण्याची पातळी वाढल्याने कोणती शहरे किती बुडणार याबाबत एक अहवाल दिला. यात मुंबई शहराबाबत सुमारे 15 से.मीं.ची वाढ (अर्धा फूट) या शतकाच्या अखेरीस महासागराच्या पातळीत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आले. याबाबत वस्तुस्थिती पाहता तापमानवाढ अनियंत्रित होण्याची प्रक्रिया चालू आहे नव्हे, ती अनियंत्रित झाली आहे. नासा संस्थेच्या ’गोडार्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीज’चे माजी संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांनी त्यांच्या ’स्टॉर्म्स ऑफ माय ग्रॅण्डचिल्ड्रन’ या ग्रंथात यापूर्वी नासाने प्रसिद्ध होऊ न दिलेली महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याप्रमाणे या शतकाच्या अखेरीस सागराच्या पातळीत किती वाढ होऊ शकते ते समजण्यासाठी, मी या ग्रंथातील पान क्र. 13 वरील मजकूर जसाच्या तसा येथे देत आहे. Global Warming of 2 degrees Celsius or more would make Earth as warm as it had been in the Pliocene, three million years ago. Pliocene warmth caused sea levels to be about twenty-five meters ( eighty feet ) higher than they are today.

या शतकात जगात सुमारे 80 फूट बुडीत होणार आहे. सन 1960 मध्ये उत्तर ध्रुव प्रदेशांतील अधिकचा बर्फ दरवर्षी वितळत आहे हे लक्षात आले. या सागरपातळीतील वाढीच्या काळात केवळ तापमानामुळे मानवजात अस्तंगत होईल. बुडवणार्‍या जहाजातील माणसे पार्ट्या करण्यात किंवा भांडण्यात गुंतली तर त्यांना काय म्हणायचे? आज मानवजात तसेच वागत आहे.

आतापर्यंत, सन 1750 च्या तुलनेत 12ओसेची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात झाली आहे. सध्या गेली दोन वर्षे 02ओसे सरासरी प्रती वर्ष या महाविस्फोटक गतीने वाढ आहे. या गतीने फक्त चार-पाच वर्षांत मानवजात वाचवण्यासाठी 2ओसेची वाढ रोखण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट ओलांडले जाईल. पृथ्वीला ही विकास संकल्पना मान्य नाही हे आपण कधी समजून घेणार. जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख डॉ. पेट्टेरी टलास या वाढत्या तापमानाबाबत काय म्हणतात ते पाहा. This trend can be expected to continue for the coming 50 years. In this system, once you reach a certain level it does not drop soon. पाच वर्षांत 1ओसे या अभूतपूर्व गतीने सरासरी तापमानात वाढ होत आहे. या कमी जास्त गतीने फक्त येत्या दोन तीन दशकांत 5 ते 6ओसेची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होईल. याचा अर्थ भयंकर आहे. या तापमानात मानवजात व जीवसृष्टी नष्ट होइल. पाच वर्षांत नागपूर व सभोवतीचा भारताचा भाग सोडावा लागेल. आताच या भागात उच्चतम तापमान 50ओसे ते 56ओसेपर्यंत पोहोचते. सध्या प्रसारमाध्यमातून आलेले वृत्त फक्त उत्तर ध्रुवप्रदेशांतील ग्रीनलँडवरील विशिष्ट तुकड्यातील बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या परिणामाबाबत आहे. खरंतर असा अभ्यास जनतेत गैरसमज तयार करतो. उत्तर ध्रुव प्रदेश, हिमालयासह सर्व पर्वतांवरील बर्फ, पूर्ण पृथ्वीवरील हिमावरण नष्ट होत आहे. सर्वत्र सागराची पातळी वाढत आहे. शहरे वाचवण्याची भाषा होत आहे. प्रत्यक्षात या शहरांमुळे पृथ्वीवर ही आपत्ती ओढवली आहे. आता अंटार्क्टिका वर्षभर वितळतो. हजारो वर्षे कधीही पाऊस न पडणार्‍या या दक्षिण ध्रुव प्रदेशांत आता मुसळधार पाऊस पडतो. हे पृथ्वीवर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शक आहे. जनता गाफील ठेवली गेली आहे. हा 2012 सिनेमा नाही. पृथ्वी आपल्याला जगवते, अर्थव्यवस्था नाही. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. याचा अर्थ समजत नसल्याने शासनाने राजापूरला तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी शेतकरी, मच्छीमारांचा विरोध असतानाही जमीन मोजणीचा प्रयत्न केला. या रिफायनरी प्रकल्पात ज्यांची जमीन जाते तेच केवळ बाधित नाहीत तर पूर्ण मानवजात व जीवसृष्टी प्रकल्पबाधित आहे. आज प्रस्थापित प्रसारमाध्यमे सत्य सांगण्यात कुचराई करत आहेत.

– अ‍ॅड. गिरीश राऊत
भारतीय पर्यावरण चळवळ /वसुंधरा आंदोलन
9869023127