‘नासा’मध्ये ग्रह सुरक्षा अधिकारी

0

वॉशिंग्टन: नासाला अंतराळातील घटकांची पृथ्वीवरील हस्तक्षेपाची चिंता सतावत असून ग्रह सुरक्षा अधिकारी हे पद त्यासाठी भरावयाची जाहिरात नासाने काढली आहे. अंतराळातील प्रदूषणकारी पदार्थांपासून पृथ्वीचे रक्षण करण्याची गरज आहे असे नासाला वाटत आहे. पदासाठी घसघशीत सहा आकडी पगारही देण्यात येणार आहे.

अमेरिका सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ग्रह सुरक्षा अधिकारी या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी १४ ऑगस्टपर्यं मुदत असून केवळ अमेरिकेचे नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील. या अधिकाऱ्याला एक लाख २४ हजार ते एक लाख ८७ हजार डॉलर इतका वार्षिक पगारही देण्यात येणार आहे.

पृथ्वीवरून अंतराळ मोहिमा आखल्यात जातात आणि येथून प्राणी, सेंद्रिय घटक सूर्यमालेतील ग्रहांवर नेले जातात. ते अनवधानाने किंवा कधी कधी जाणीवपूर्वकही नेले जातात. ग्रहांवरील स्फोट, ताऱ्यांचे स्फोट, यांनांचे तुकडे व अन्य पदार्थही पृथ्वीला हानिकारक ठरू शकतात. अंतराळनिर्मित प्रदूषणासाठी जागतिक स्तरावर धोरण आखले पाहिजे, असे अमेरिकेला वाटत आहे.