‘नास्ते पे चर्चा’; फडणवीस-खडसे-महाजन एकत्र !

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात नाराज आहे. पक्षविरोधी वक्तव्य देखील ते करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला उमेदवारी न मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातच काल गुरुवारी रात्री खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. दरम्यान आज शुक्रवारी ३ रोजी देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. त्यांनी सोबत सकाळचा नास्ता करत चर्चा केली. जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर खडसे-फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट झाली. काल खडसे यांनी मी फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केलेच नाही फक्त कोअर कमिटीत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितल्याचे सांगून खडसेंनी यू-टर्न घेतला.

फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली जळगावात आले होते. नाराजीबाबत त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही असे खडसे यांनी सांगितले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली आहे. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही’ असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.