नाहाटात सात दिवसीय भाषा व साहित्य उत्सव

0

1 ते 7 फेब्रुवारीदरम्यान शहरात आयोजन ; विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

भुसावळ- कला, विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभाग व इंग्रजी भाषा आणि साहित्य परीषद (इला) यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय भाषा व साहित्य उत्सवाचे आयोजन 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. इंग्रजी भाषा ही परकीय भाषा असून त्या विषयी आजही विद्यार्थ्यांच्या मनात भीती व न्यूनगंड आहे मात्र सर्वच क्षेत्रांमध्ये इंग्रजीचे वाढते महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व चालना मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यांची राहणार उपस्थिती
1 फेब्रुवारी होणारी साहित्य उत्सवाचे उद्घाटन उमवि सिनेट सदस्य भौतीकशास्त्र विभागातील प्रा.ई.जी.नेहेते यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे, प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी, प्रा.एन.ई.भंगाळे आदी उपस्थित राहणार आहे.

हे मान्यवर करणार मार्गदर्शन
पहिल्या दिवशी ‘नोकरीच्या संधी’ या विषयावर प्रा.एस.ए.सुरवाडे (बार्टी समन्वयक, जामनेर) यांचे व्याख्यान होईल. दुसर्‍या दिवशी साहित्य व भाषा प्रश्नमंजुषा, तिसर्‍या दिवशी पोस्टर प्रदर्शन, चौथ्या दिवशी निबंध लेखन व सादरीकरण, पाचव्या दिवशी चलचित्र दाखविण्यात येणार आहे.