भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ आणि विद्यार्थी परीषदेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव यांच्या सहकार्याने विद्यार्थी तसेच परीसरातील सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायांची संधी प्राप्त होऊन स्वयंम रोजगार निर्माण होण्यासाठी 7 ते 9 या कालावधीत उद्योजकता जागृती शिबिर होत आहे. 7 रोजी सकाळी 10.30 वाजता ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उद्घाटन होईल.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा यांच्यासह प्राचार्य डॉ.एम. व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, समन्वयक प्रा.एस.टी.धूम, डॉ.ए.डी.गोस्वामी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. या सत्रात शिबिर उदिष्टे, उद्योजकता म्हणजे काय ? या विषयावर जळगाव सेंट्रल बँकेचे अरुण प्रकाश, बाळकृष्ण चौधरी, जळगाव डीआयसीचे सुनील पाटील, एमसीईडीचे प्रकल्पाधिकारी आनंद विद्याधर मार्गदर्शन करणार आहेत. सत्र दोनमध्ये नवल शिंदे हे विस्तृत प्रकल्प अहवाल, प्रकल्प वित्त व लेखा या विषयावर मार्गदर्शन करतील तर 3 व 4 मध्ये अपूर्वा वाणी या ध्येयनिश्चिती व प्रेरणा आणि व्यवसायातील चांगल्या परीणामासाठी संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करतील.
8 रोजी व्यवसायातील संधीवर मार्गदर्शन
8 रोजी सत्र 5 आणि 6 मध्ये संजय शिंदे हे व्यवसाय संधीची ओळख, वस्तू निवड यंत्रणा, वस्तू कल्पना व व्यवसाय संधी, उद्योजकता आणि वर्तमान दृष्टीकोन यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ‘भारतातील मूल्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर सत्र 7 आणि 8 मध्ये श्राजीत नायर हे बाजाराचे सर्वेक्षण आणि लघू उद्योग सुरू करण्याचे तंत्र व व्यापारी बाजू या विषयावर मार्गदर्शन करतील. 9 रोजी सत्र 9 व 10 मध्ये शंकर भावरे ‘लघू उद्योग कसा सुरू करावा’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर सत्र 11 मध्ये यशस्वी उद्योजकांचे अनुभव आशिष इलेक्ट्रिकल जळगावचे संजय इंगळे अनुभव कथन करतील तेसच सत्र 12 मध्ये अभिप्राय चर्चा आणि समारोपाचा कार्यक्रम होईल.
समारोपाला यांची उपस्थिती
समारोपाला जळगावचे कार्यक्रम समन्वयक हर्ष तिवारी उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेटरी विष्णू चौधरी उपस्थित राहतील. महाविद्यालयाचे प्राचार्य एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे उपस्थित राहतील. ी गरजू सुशिक्षीत बेरोजगारांनी शिबिरात भाग घेण्यासाठी समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी ( 9422563536), प्रा.एस.टी.धुम ( 9420592952 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांनी केले आहे. शिबिर यशस्वितेसाठी विद्यार्थी परीषदेचे सदस्य डॉ.एन.एस. पाटील, डॉ.पी.ए.अहिरे, डॉ. स्मिता चौधरी, डॉ.विद्या पाटील, डॉ.पी.के.पाटील, प्रा.डी.एन.पाटील, डॉ.ए.व्ही. उपाध्याय, डॉ.एस.डी.येवले, भगवान तायडे तसेच नियोजन अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.व्ही.ए.सोळुंके, डॉ.रश्मी शर्मा, डॉ.ममताबेन पाटील, डॉ.किरण वारके, प्रा.जे.पी.अढोकार परीश्रम घेत आहेत.