नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची 23 वी सभा संपन्न

भुसावळ कला, विज्ञान व पु.ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये 26/08/2023 शनिवार रोजी 2023-24 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सभेत इ. 11वी व इ.12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी लीना लक्ष्मण वानखेडे व सचिव पदी प्रा. कांचन राणे यांची निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव विष्णू भाऊ चौधरी व कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच उपप्राचार्य वाय. एम. पाटील सरांनी प्रास्ताविक सादर केले. पालक मनोगत शैलेश मोहनराव पाटील यांनी केले.अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन एन. वाय. पाटील व के.एम. राणे यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन के.एम.चौधरी यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीमती.एस. ए. पाटील, समिती सदस्य ए. एस. सपकाळे , एस. आर.नारखेडे, टी. एल. चौधरी , व्ही.डी.सावकारे यांनी सहकार्य केले.