दिनांक 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. महाविद्यालयाचा क्रीडा विभाग व एन.एस.एस.तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस आनंदात व उत्साह जोरदारपणे साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील ह्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद ह्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केल्यावर आयोजित केलेल्या बॅडमींटन स्पर्धांना सुरुवात झाली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जवळपास दोनशे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते . महीला प्राध्यापकांची लक्षणीय उपस्थीती होती. स्पर्धेमधील विजेते विद्यार्थी , विद्यार्थिनी व महाविद्यालय शिक्षक कर्मचारी यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले . बक्षीस वितरण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी.एच. बर्हाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर प्रसंगी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. ई.जी. नेहेते व प्रा. व्ही . डी. जैन, प्रा. आर. .आर . पाटील, प्रा. एन. एस . पाटील व इतर वरिष्ठ प्राध्यापक उपस्थीत होते. क्रिडा संचालक डॉ. आनंद उपाध्याय व वारके सर यांच्या मार्गदशना खाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे श्री. शाम भारंबे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.प्रशांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव प्राध्यापक विरुद्ध विद्यार्थी यांची सुद्धा बॅडमिंटनची दुहेरी स्पर्धा पार पडली.