विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन ; प्रवेश समितीचेही गठण
भुसावळ- भुसावळ कला आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वरीष्ठ महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीपत्रकानुसार 15 जुन 2018 पासून एफ.वाय.बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी. बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस, एस.वाय.बी.कॉम, टी.वाय.बी.कॉम., एस.वाय.टी.वाय. बी.ए.विशेष स्तर मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, एम. ए मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, संगीत, भूगोल तर एम.एस्सी.साठी, रसायनशास्त्र, गणित आणि संगणकशास्त्र, एम.कॉम., एस.वाय.बी.एस्सी.रसायनशास्त्र, गणित, भौतीकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान या विषयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी समितीसाठी गठीत
प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही. वायकोळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. ए. डी. गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. कला शाखेसाठी प्रा.डॉ.के.के.अहिरे प्रमुख तर वाणिज्य शाखेसाठी उपप्राचार्य प्रा.एन.ई.भंगाळे तर विज्ञान शाखेसाठी डॉ.एन.एस.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नाहाटा महाविद्यालय परीसरातील वर्ष 1963 चे जुने महविद्यालय असून महाविद्यालयाने कायमस्वरूपी आपला दर्जा टिकवून ठेवला असून ‘अ’ दर्जाचे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अष्टपैलू नागरिक तयार व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जातात. एन. सी. सी, एन. एस. एस, क्रीडा, कला, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थीनी विकास केंद्र या उपक्रमांबरोबरच उमवि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिकवा योजना राबविली जाते. योजनेंतर्गत 40 ते 42 विद्यार्थी – विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो.
प्रवेशासाठी महाविद्यालयातर्फे आवाहन
महाविद्यालयात सर्वच विद्या शाखांमध्ये तज्ञ प्राध्यापक असून एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी या उच्च शिक्षणाबरोबरच मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र. संगणकशास्त्र, वाणिज्य इत्यादी विषयांमध्ये पी.एच.डी. साठीचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपला प्रवेश त्वरीत निश्चित करावा, असे आवाहन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा आणि सन्माननीय सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.एन.ई.भंगाळे यांनी केले आहे.