नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आयोजित म. गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भुसावळ प्रतिनिधी दि. 2 ऑक्टोबर 23, सोमवार रोजी म.गांधी जयंती निमित्त नाहाटा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाने वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन जनजागृती अभियान या उपक्रमांतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छते सोबतच जुन्या झाडांना आळे करणे, पाणी देणे इत्यादी कार्य करून गांधीजींना अभिवादन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. डॉ. एस.टी. धुम, प्रा. डॉ.आर एस नाडेकर ,प्रा. गौतम भालेराव, प्रा. डॉ. सचिन राजपूत, प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. अक्षरा साबळे, प्रा. शिवानी माळी प्रा. डॉ. सुनील अडकमोल तसेच कमवा व शिका योजनेतील सर्व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.