-भुसावळ प्रतिनिधी दि 5
येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. . ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय च्या स्टॉप अकॅडमी आणि स्टॉप अँड स्टूडेंट वेल्फेअर कमिटी अंतर्गत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री डॉ . मोहनभाऊ फालक हे होते. संस्थेचे चेअरमन मा. श्री . महेशभाऊ फालक, खजिनदार मा श्री संजयजी नाहाटा, प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ ए डी गोस्वामी सिनेट सदस्य प्रा . ई. जी . नेहेते , कनिष्ठ महाविद्यालय चे उपप्राचार्य प्रा वाय एम पाटील, पर्यवेक्षीका प्रा स्वाती पाटील , प्रा डॉ पी ए अहिरे – – आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक – विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. ई. जी नेहेते यांनी केले . स्टॉप वेलफेअर अँकडमी चे चेअरमन डॉ पी ए अहिरे यांनी सांगितले की समाजात सामाजिक अभिसरण घडवून आणला जाणारा शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरूजी या थोर समाजसुधारांनी शिक्षकांन बाबत सखोल माहिती दिली . संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहनभाऊ फालक अध्यक्षीय भाषणात म्हणाले की – सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी भारतीयांसाठी मोलाचे कार्य केले आहे . त्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या . उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य,अभ्यास मंडळ सदस्य, पुस्तक प्रकाशन, शोधनिबंध, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध निबंध तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा स्मिता बेंडाळे, प्रा संगीता भिरुड यांनी केले . यावेळी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कर्मचारी आदी उपस्थित होते . प्रा स्मिता बेंडाळे यांनी आभार मानले .