नाहाटा महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

0

भुसावळ– कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांची झलक दाखवत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सिनेअभिनेता विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विनोदी नाट्यछटा सादर करीत तरुणाईची मने जिंकली. तरुणांनी वन्स मोअर करीत दाद दिली.

स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सांस्कृतिक मंडळाचे चेअरमन एन.पी.निळे, कला मंडळाचे चेअरमन एस.एन. भोळे, प्रा.जे.ए. चौधरी, प्रा.एम.ए.चौधरी, प्रा.एल.पी.टाक, प्रा.आर.एम.तडवी, प्रा.ए.एस.सपकाळे, प्रा.आर.एम.देशपांडे, प्रा.ए.टी. जग्यासी, प्रा.एस.आर. नारखेडे यांनी परीश्रम घेतले. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य एस.बी.पाटील, पर्यवेक्षक यु.बी.नंदाणे, समन्वयक प्रा.आर.एम.खेडकर, प्रा.यु.एस.सुरवाडे, प्रा.स्वाती पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन लेखा लढे, कुंजन पाटील तर आभार मीनल कापसे, प्रणाली पाटील यांनी मानले.