नाहाटा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन संपन्न-

भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील,श्री अंगद आसटकर नायब तहसीलदार उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी भूषविले.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन महेश फालक, प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए. डी. गोस्वामी कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका श्रीमती प्रा.स्वाती पाटील, क ब चौ उ म वि जळगाव अधिसभा सदस्य प्रा. ई .जी नेहते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला श्री अंगद आसटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वतःचे अनुभव सांगितले की मी ज्या वेळेला एमपीएससीची तयारी करत होतो त्या वेळेला मी कोण कोणती खबरदारी घेतली,अभ्यास करत असताना आपण बैठकीला जास्त महत्त्व द्यावे आणि स्पर्धा परीक्षा पास करायची असेल तर जिद्द व चिकाटी या गोष्टींचा संगम हवा तरच आपण स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो याशिवाय त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार जनजागृतीसाठी आणि आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते मा.श्री.जितेंद्र पाटील म्हणाले की, स्पर्धा परीक्षेतून करियर करणे आव्हानात्मक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा परीक्षा आपणास यश मिळवून देते.स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी कठीण परिश्रम , आत्मविश्वास व व्यक्तिमत विकासाची आवश्यकता असते.अध्यक्षीय भाषणात डॉ मोहन फालक म्हणाले की,आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आपल्या महाविद्यालयात मिळते.त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ममताबेन पाटील यांनी केले.तर आभार डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी मानले. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी प्रा.डॉ.जी.आर. वाणी,प्रा.डॉ.सचिन येवले,प्रा.डॉ. डी.एम.टेकाडे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.हर्षल पाटील,प्रा.संगीता भिरूड,प्रा.पुनम महाजन,प्रा.डॉ सचिन कोलते, प्रा.डॉ.विलास महिरे,प्रा.डॉ.अजय क्षीरसागर,प्रा.व्ही.ए सोळुंके,प्रा.डॉ. सचिन राजपूत,प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा.खिलेश पाटील प्रा.सपना कोल्हे, प्रा.पी.पी.महाजन,प्रा.डॉ.विठ्ठल केंद्रे,प्रा.आकाश तायडे प्रा प्रणिता राणे,प्रा.नीलिमा पाटील,प्रा.सागर सोनवणे.यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.