नाहाटा महाविद्यालयात 22 ते 23 रोजी राष्ट्रीय परिषद

0

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ (सीपीसीएस-2017) या विषयावर राष्ट्रीय परिषद 22 व 23 डिसेंबर रोजी येथे होत आहे. 22 सकाळी 9.30 वाजता महाविद्यालयातील परीषद हॉल ए 36 मध्ये उमविचे प्र. कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते परीषदेचे उद्घाटन होईल.