जळगाव: जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. या संदर्भात आज शासन आदेसह पारित झाले आहे, शेवटच्या टप्प्यात का होईना जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ना. महाजन हे जळगावच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली ८ जागा युतीने जिंकले, त्यामुळे त्यांचा वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. भाजप सरकारमध्ये सुरुवातीला माजी मंत्री एकनाथराव खडसे जळगावचे पालकमंत्री होते.
