चाळीसगाव / पहूर । राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्ह्याभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याभरात गिरीश महाजन यांना दिर्घ आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. पहुर व चाळीसगाव येथे महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. चाळीसगाव शहरात विविध आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमातुन मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री योजना नगरपालिकेच्या वतीने शहरात राबवली जाणार आहे. यात नव्याने जन्माला आलेल्या मुलीच्या नावाने 21 हजार रुपयांचा विमा काढण्यात येईल व 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीला एक लाखाचा धनादेश देण्यात येईल.
कर्करोग तपासणी : भारतात स्त्रियांमधील स्तनाचे कर्करोग प्रमाण वाढले आहे. ही बाब चिंतादायक असून केवळ अपूर्ण माहिती व वेळेवर निदान न झाल्यामुळे हजारो महिलांना जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक यांच्या सहकार्याने स्तनकर्करोग तपासणीसाठी एक मेमोग्राफी मशीन ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांमधील हिमोग्लोबीनची तपासणी देखील करण्यात येणार आहे. प्रख्यात रेडीओलॉजिस्ट डॉ. अनुप पवार यांनी मेमोग्राफी मशीनची माहिती दिली.
चाळीसगाव येथे उपस्थित: सदर उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी महिला आयोगाच्या सदस्या देवयानीताई ठाकरे, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, के.बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, आर घृष्णेश्वर पाटील, दिनेश बोरसे, नगरसेवक शेखर बजाज, नितीन पाटील, अरुण अहिरे, मानसिंग राजपूत, अमोल नानकर, राकेश बोरसे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पहूरला 2972 रुग्ण तपासणी
पहूर ग्रामीण रुग्णालयातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 2972 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन झेडपी अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्तनकर्करोगाचे 17 रुग्ण आढळून आले तर नेत्रतपासणी करण्यात आलेल्या 125 रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी झेडपी सदस्य अमित देशमुख, राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, अॅड.एस.आर. पाटील, शरद पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, सलीम शेख गणी, वासुदेव घोंगडे, लक्ष्मण गोरे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.