जळगाव । सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यासाठी मतदारसंघात जय्यत तयारी केलेली आहे.ना.गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते.त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाला मोट्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.ना.गुलाबराव पाटील यांना शुभेच्या देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नेते व कार्यकर्ते पाळधीला येणार असल्याचे बोलले जात आहे. गुलाबराव पाटील यांच्या भाषणाची जिल्हा वासीयांना उत्सुकता लागून आहे. यावेळी सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत विविध संघटना मार्फत करण्यात आले आहे.
या उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी ना.गुलाबराव पाटील यांची पुस्तक तुला अनेक शिक्षण प्रेमी मार्फत करण्यात येणार आहे. यात 9 वी ,10 वी ,स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षा पुस्तकांचा समावेश असेल. तसेच गरीब रुग्णांसाठी रमाई हॉस्पिटल , जळगाव मार्फत औषधी तुला देखील करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी काठ्या, रुमाल व टोपयांचे वाटप पाळधी शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे.तर ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्याने मोठया वृक्षांची लागवड करून भाऊंचे उद्यान करण्यात येणार आहे,.यासाठी 100 मोठे 12-15 फूट उंचीचे झाडे पुणे येथून मागविण्यात आले.आज ना.पाटील यांच्या हस्ते सदर वृक्षारोपण करण्यात येईल. मतदार संघातील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या 100 पाल्यांसाठी (विद्यार्थी ) शैक्षणिक साहित्य व वह्या पुस्तके वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात येणार आहे.
5 दिव्यांग बांधवाना मिळणार मोटारसायक
जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजलीताई बाविस्कर यांच्या मार्फत सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे सायंकाळी 6.00 वाजता ना.गुलाबभाऊ पाटील व मान्यवरांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील 3 व जळगाव तालुक्यातील 2 अश्या 5 गडयाचे वाटाय करण्यात येईल.तसेच आदिवासी कोळी महासंघाचे मुकेश सोनवणे यांच्या मार्फत सामान्य रुग्णालयात अन्नदान करण्यात येणार आहे.दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आज 5 जून रोजी सायंकाळी 6.00 वाजता पाळधी ता धरणगाव येथे भव्य सभा होणार असल्याने या सभेत मुलुख मैदान तोफ झळकणार आहे. ल