दोंडाईचा । राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या तिथीप्रमाणे जयंतीसाठी थेट उदयपूर येथील महाराणाचे वशंज श्री लक्ष्यराजसिंह मेवाड यांच्या समवेत महाराणा प्रताप यांना अभिवादन केले. महाराणा प्रताप यांचा इतिहास हा प्रेरणादायी असून या पवित्र दिवशी महाराणांना उदयपूर येथे जाऊन अभिवादन करण्याचा संकल्प ना. जयकुमार रावल यांनी केला होता. त्यानुसार मंत्री रावल उदयपूर येथे पोहचले. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 477 वी जयंती रविवारी उदयपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्षत्रिय महासभाच्या लोकांनी मोतीमगरी स्थित महाराणा प्रताप की अश्वारूढ़ प्रतिमेला पुष्पाजंली वाहिली. यावेळी महाराणांचे वशंज लक्ष्यराजसिंह मेवाड यांच्यासमवेत उदयपूरच्या महापौर चन्द्रसिंह कोठारी, आ. फूल सिंह मीणा, राजपूत समाजाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.