मुंबई । वाढदिवसादिवशी ज्यांना योगदान द्यायचे आहे, अशा मंडळींनी शेतकर्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात मदतीच्या रूपात योगदान द्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याचाच आदर्श ठेवत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना असेच आवाहन केले. त्यानुसार जमा झालेली 13 लाख 17 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजच्या बैठकीत सुपूर्द केला आहे.
स्मिता वाघ यांचे मासिक वेतन
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विधान परिषदेचेच्या आमदार स्मिता वाघ यांनी आपल्या एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी दिले असून खान्देशातून मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधी देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीतून बळीराजाला आपत्ती, नैसर्गिक संकटात तातडीने मदत केली जाते.
देशासह राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्ष तसेच शासन हे कटिबद्ध आहे. देशातील शेतकर्यांना मानसिक तसेच आर्थिक सहाय्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी आम्हाला विधिमंडळात असे आवाहन केले व मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तसेच शेतकर्यांना दिलासा व आमच्याकडून छोटीशी मदत म्हणून मी हे काम केले.
– स्मिता वाघ, विधानपरिषद सदस्य