ना.भामरेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

0

धुळे। संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत मेहेरगांव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, देवेंद्र पाटील व अ‍ॅड. राहुल पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी मेहेरगांव येथे भारतीय जनता पार्टीचे शाखेच्या फलकाचे अनावरण ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राजेंद्र आनंदा भामरे, अभिमन्यू भामरे, दिलीप यशवंत भामरे, नंदू भामरे, नागो भामरे, रवींद्र वाघ, सुभाष भामरे, विेशास भामरे, योगेश भामरे, भैयू भामरे, सुभाष पाटील नवलाणे येथील दीपक बागुल, व कावठी येथील रामकृष्ण पाटील, बापू हरी नेरकर, दीपक मोरे, संदीप पाटील, समाधान नेरकर, व निकुंभे येथील दादाभाई भटू गिरासे, विजय महाले यांच्यासह मेहेरगांव व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.