ना. भामरे यांच्यासह चौघांचा कापडण्यात गौरव

0

धुळे । कापडणे गावाचे सुपुत्र व नांदेडचे आमदार हेंमत पाटील, मुंबई पोलीस उपायुक्त शांतीलाल भामरे यांच्या सोबत खान्देशचे सुपुत्र ना.डॉ.सुभाष भामरे आणि औरंगाबाद जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगांवकर या चार भुमिपुत्रांचा नागरी सत्कार रविवार,दि.28 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे असतील. याप्रसंगी ना.जयकुमार रावल, ना.दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवर आमदार उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कापडणे ग्रामस्थांनी केले आहे.

विविध पक्षांतील नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने होणार असून कापडण्याच्या छत्रपती शिवाजीमहाराज पुतळयापासून ते जुना गाव दरवाजा सभा स्थळापर्यंत सजवलेल्या बैलगाडीवरील मिरवणुकीने होणार आहे. या कार्यक्रमाला पाचोर्‍याचे आ. किशोर पाटील, आ. अनिल कदम, आ. उन्मेष पाटील व आ. कुणाल पाटील व शिवसेनेचे संपर्कनेते बबनराव थोरात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, शिवसेना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हेंत साळुंखे, दलित नेते वाल्मिकआण्णा दामोदर, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदच्या विद्यमान शिक्षण सभापती नुतन शेखर पाटील, शेतकरी संघटनेचे गुलाबसिंग रघुवंशी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ अंकुश पाटील, पंचायत समिती सदस्या उषा शरद माळी, कापडण्याचे उद्योजक ज्ञानेश्‍वर आनंदा भामरे व सरपंच राजेंद्र साहेबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार प्रा.शरद पाटील, बापू खलाणे, कापडणे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी-तरुणांनी
केले आहे.