यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणावरून चोरट्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसाची दुचाकी लांबवल्याने खळबळ उडाली आहे.
चोरट्यांना उरले नाही पोलिसांचे भय
सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरणावर पर्यटकांसोबत या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने अनेक भामटे देखील येत आहे. त्यातच शुक्रवारी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी किशोर पाटील हे आपल्या लाल रंगाच्या पल्सर दुचाकी (क्रमांक एम. एच.19 ए.झेड. 5088) वर आले होते. धरण परीसरात त्यांनी दुचाकी लावून दिली होती आणी आपल्या मित्रांसोबत धरण परीसरात ते फेरफटका मारण्यासाठी जाताच चोरट्यांनी संधी साधली. यावल पोलिसांना दुचाकी चोरीची माहिती कळवण्यात आली आहे. पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबवल्याने आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.