रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील दि 23 मे रोजी 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पोझिटीव्ह आल्याने मृत्यू झाला होता.विशेष म्हणजे त्याला उपचारासाठी जळगाव येथे नेत असतांना मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे स्वॅब पोझिटीव्ह अल्याने निंभोरासिम येथे कोरोनाला तांडव करण्याची आयती संधी प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे उपलब्ध झाली गावात आता पर्यंत 13 जण कोरोना पोझिटीव्ह आले आहे.
कोरोना’ने तालुक्यात तांडव करायला सुरुवात केली आहे.रोजचे रिपोर्ट बघुन प्रशासन जनता सर्वच टेंशन मध्ये आले आहे.एकट्या निंभोरासिम मध्ये तब्बल 13 जण कोरोना पोझीटीव्ह आले असून याला निव्वळ अंत्यसंस्कार कारणीभूत ठरले आहे.यानंतर आरोग्य विभागाने गावातील 72 जणांना कोरोंटाईन केले असून यापैकी हाय-रिक्स असलेल्या 37 जणांचे स्वॅब आरोग्य प्रशासनाने घेतले आहे.त्यापैकी 13 जण गावातुन पोझीटीव्ह आले आहे.या सर्व घटनेला फक्त अंत्यसंस्कार कारणीभूत ठरले आहे.
अंत्यसंस्कारला गर्दी जमण्यास जिल्हाधिका-यांचा होता मज्जाव
जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकने यांचे जिल्हात कुठेही अंत्यसंस्कार करायला फक्त 20 लोकांना परवानगी दिली होती. परंतु निंभोरासिम येथिल 52 वर्षीय कोरोना पोझिटीव्ह पेशंटच्या अंत्यसंस्कारमध्ये यापेक्षा जास्त लोक होते. यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेश्याला येथेच केरीची टोपली दाखवली गेली परीणामी म्हणून गावात कोरोना’चा तांडव सुरु झाला नंतर प्रशासनाला उशिरा सूचलेल्या शहानपणातून अंत्यसंस्कारमध्ये सहभागी झालेले 27 लोकांवर ग्राम सेवकाने गुन्हे दाखल केले
असा झाला घटनाक्रम
निंभोरासिम येथे दि 23 रोजी 52 वर्षीय व्यक्तीला
श्वास,ताप, व खोकल्याचा त्रास होता त्यांच्या मुलाने त्यांना मुक्ताई नगर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले व तेथे त्यांचे स्वब घेऊन त्यांना जळगाव येथे पुढील उपचारार्थ हलवण्यात आले जळगाव जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे मृत्यूदेह त्यांच्या राहत्याघरी निंभोरासिम येथे आणण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर पारंपारीक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले यामध्ये त्यांचे सर्व नातलक व गावातील काही लोक सहभागी झाले होते.नंतर मयत 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव आल्याने आरोग्य प्रशासन खळबळुन जागे झाले तो पर्यंत खुप उशीर झाला होतो. गावात कोरोनाने त्याचा तांडव दाखवण्यास सुरुवात केली होती आता पर्यंत गावात मयत धरून 14 जण कोरोना पोझिटीव असून ही बातमी सर्वांसाठी चिंतेत टाकणारी आहे.
अंत्यसंस्कार मधून कोरोनाचा स्प्रेड वाढण्याची जिल्हात दूसरी घटना
कोरोना जिवघेणा व्हायरस संसर्ग अंत्यसंस्कार मधून वाढण्याची ही दूसरी घटना आहे.यापुर्वी भडगाव तालुक्यात सुध्दा अंत्यसंस्कार मधून कोरोना व्हायरस संसर्ग अश्या प्रकारे वाढला होता आणि आता रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथील मधून देखिल अंत्यसंस्कार मधून कोरोनाचा स्प्रेड वाढला आहे.