रावेर : तालुक्यातील निंभोरासीम येथे 58 वर्षीय प्रौढाचा अकस्मात मृत्यू झाला असून खबरदारी म्हणून आरोग्य अधिकारी यांनी कोरोना संशयीत म्हणून स्वूब घेवून तपासणीसाठी पाठवले आहेत. रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील 58 वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी शेतात दिवसभर काम केल्यानंतर रात्री अचानकपणे ताप आल्याने त्यांची तब्बेत बिघडल्याने प्रथमोपचारासाठी मुक्ताईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोग्य अधिकारी यांनी खबरदारी म्हणून मयताचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविले आहेत.