निंभोरा ग्रामपंचायतीच्या बिला बाबत वादंग

0

दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही : सरपंच डिगंबर चौधरी

निंभोरा- येथील ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील वाद सलग दोन दिवसापासुन सुरू आहे.यामूळे यासंदर्भात खुलासा देण्यासाठी सरपंच डिगंबर चौधरी यांनी पत्रकार परिषद घेवून उपसरपंच सुभाष महाराज यांनी केलेल्या आरोप व राजीनामा मागणीचा समाचार घेतला.त्यात उपसरपंच यांच्या कोणत्याही कामात अडथळा न आणता सर्व सहकार्य केले असे असूनही दादागिरी व अरेरावी कशी खपवून घ्यायची? असा प्रश्‍न केला.तसेच त्यांनी केलेल्या कामाचे चेक दिल्यावर त्याबाबत लेखी लिहून कसे देणार? बस स्टॅन्ड परिसरात आवाज वाढवून कामे होत नसल्याचा खोटा आरोप केला.अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.यावेळी उपसरपंच सुभाष महाराज व ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी उपसरपंच यांनी शिवीगाळ केल्यावरही आपण संयम बाळगल्याचे सांगितले.मात्र चुकीचे आरोप खपवून घेणार नाही व आपण चेक देतांना संबंधितांना ओळखत नाही व आधीच्या ग्रामसेवकाने कोणतेही देणे बाकी बाबत माहिती दिली नसल्याने चौकशी करून पेमेंट काढणे आपले कर्तव्य असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परीषदेतही गदारोळ
उपसरपंच यांनी ही आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सदस्य हि पत्रकार परीषदेत आल्याने गदारोळ निर्माण झाला . ग्रामपंचायत सदस्य रमेश येवले व मुजाहिद शेख यांनी पत्रकार परिषदेबाबत माहिती न दिल्याबाबत संताप व्यक्त केला.यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रभाकर सोनवणे,मधुकर बिर्‍हाडे, सतीश पाटील,दस्तगिर पटेल,युनूस खान ,दुर्गादास पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.मात्र गदारोळ वाढत गेल्याने ग्रामस्थही आल्याने दोन तास हा गोंधळ निर्माण झाला होता.